दिव्यांग कला केंद्रात विशेष मुलांसोबत रंगांची आनंदमयी होळी साजरी

दिव्यांग कला केंद्रात विशेष मुलांसोबत रंगांची आनंदमयी होळी साजरी

Published on

दिव्यांग कला केंद्रात विशेष मुलांची आनंदमयी होळी
षडरीपुंचे दहन करून दिला सकारात्मकतेचा संदेश
ठाणे, ता. ३ (बातमीदार) : दिव्यांग कला केंद्र येथे संचालक किरण नाकती यांच्या संकल्पनेतून मागील १० वर्षांपासून विशेष मुलांसाठी अनोख्या पद्धतीने होळी साजरी करण्याची परंपरा जपली जात आहे. यंदाही केंद्रात उत्साह, आनंद आणि रंगांची उधळण करत विशेष होळी साजरी करण्यात आली. काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर या षडरीपुंचे प्रतीकात्मक दहन करून मुलांमध्ये सकारात्मक विचार आणि चांगल्या संस्कारांची जाणीव करून देण्यात आली.
होलिकापूजनानंतर विशेष मुलाने रंगांची उधळण करत सणाचा मनमुराद आनंद लुटला. हा रंग केवळ होळीचा नसून सुख, समाधान आणि आशीर्वादाचा असल्याची भावना या वेळी व्यक्त केली. मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला निरागस आनंद पाहून समाधान शब्दात व्यक्त करता येत नसल्याचे मत किरण नाकती यांनी व्यक्त केले. केंद्राच्या संचालिका संध्या नाकती यांनी सांगितले की, दिव्यांग कला केंद्राच्या स्थापनेला यंदा १० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने सर्व मुलांसोबत पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली. या मुलांनाही होळीचा आनंद घेता यावा, रंगपंचमी खेळता यावी आणि सणाचा उत्साह अनुभवता यावा, यासाठीच आम्ही हा उपक्रम राबवतो, असे त्यांनी नमूद केले. मुलांनी एकमेकांना रंग लावत आनंदाने सण साजरा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com