लेखक काशिनाथ माटल यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

लेखक काशिनाथ माटल यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

Published on

लेखक काशिनाथ माटल यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

शिवडी, ता. ३ (बातमीदार) : मुंबईचे ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ माटल यांना त्यांच्या ‘सावट’ या उत्कृष्ट कथासंग्रहासाठी मराठी भाषा दिनानिमित्त ‘धर्मवीर छत्रपती महाराज राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार-२०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले. फलटण येथील ॲग्रो न्यूज परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुण्याच्या चपराक प्रकाशनने अत्यंत सुबकतेने प्रकाशित केलेल्या ‘सावट’ या कथासंग्रहाचे प्रकाशन दिल्ली येथे अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये झाले होते. त्यानंतर हे पुस्तक राज्यभर बहुचर्चित ठरले. फलटण येथील नवलबाई मंगल कार्यालयात पार पडलेल्या संमेलनाचे उद्‍घाटन मठपती प. पू. तपोनिधी शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष म्हणून श्रीमंत अनिकेतराजे निंबाळकर उपस्थित होते, तर संमेलनाध्यक्ष म्हणून प्रा. विजय काकडे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ शिंदे, अशोक मेहता तसेच ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश सस्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.
पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि मानाचा फेटा असे होते. या वेळी कादंबरी, चरित्रग्रंथ, प्रवासवर्णन, कविता, गझल तसेच उत्कृष्ट दिवाळी अंकांना ‘साहित्य सेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. संमेलनाध्यक्ष प्रा. विजय काकडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, की उत्कृष्ट साहित्य सेवेसाठी दर्जेदार साहित्याचीच निवड करण्यात आली आहे. कथालेखक काशिनाथ माटल यांचे अनुबंध, एक क्षण, खेळ मांडियेला नवा, बेवारस आणि सावट हे पाचही कथासंग्रह वाचकप्रिय ठरले असून, त्यांचे लेखन साहित्यविश्वात वेगळी छाप पाडणारे आहे. दरम्यान, या यशाबद्दल राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने अध्यक्ष आमदार सचिन अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी काशिनाथ माटल यांचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com