डॉ. नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दीनिमित्त महास्वच्छता अभियान
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दीनिमित्त महास्वच्छता अभियान
श्रीसदस्यांच्या श्रमदानातून मुरूड शहर चकाचक
मुरूड, ता. ३ (बातमीदार) : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशभर राबविण्यात येत असलेल्या महास्वच्छता अभियानाला मुरूड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामूहिक श्रमदानातून स्वच्छतेचा विचार कृतीत उतरवत श्रीसदस्यांनी आपल्या सद्गुरूंना अनोखी अभिवादनपर भेट दिली.
पोलिस उपनिरीक्षक बळीराम केंद्रे, अर्चना मोगरे व नायब तहसीलदार कल्याण देऊळगावकर यांच्या उपस्थितीत मोहिमेला प्रारंभ झाला. सबनीस आळी, गावदेवी पाखाडी, डॉ. आंबेडकर रोड, दस्तुरी नाका, लक्ष्मीनारायण मंदिर परिसर, गणेश आळी व मुरूड कोळीवाडा येथे झाडी छाटून रस्ते स्वच्छ करण्यात आले. या अभियानात ५१३ श्रीसदस्यांनी सहभाग घेत सुमारे अडीच टन ओला व दीड टन सुका कचरा संकलित करून विल्हेवाट लावली.
चौकट
स्वच्छतेतून सामाजिक बांधिलकीचा संदेश
स्वच्छता ही केवळ मोहीम नसून ती सामाजिक जबाबदारी आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. निरोगी समाजासाठी स्वच्छ परिसर आवश्यक असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

