मुरुड तालुक्यात होळीचा सण पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा
मुरूड तालुक्यात होळीचा सण पारंपरिक पद्धतीने साजरा
मुरूड, ता. ३ (बातमीदार) ः मुरूडसह नांदगाव, मजगाव, आदाड बोर्ली- मांडला आदी गावपाड्यांवर होळी पौर्णिमा व धुळवडीचा सण पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. गावागावांत होळीला आकर्षक रंगांनी सजवून फुलांच्या माळा, रांगोळी व विद्युत रोषणाईने सजवून उत्साह साजरा करण्यात आला.
महाशिवरात्रीनंतर छोट्या होळ्यांची बालगोपाळांकडून सुरुवात होते. सर्व बाळगोपाळ अखंड गावभर फिरून लाकडे गोळा करत छोट्या होळ्या साजरा करतात आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक घरातून एक लाकूड व एक नारळ होळीमध्ये अर्पण करण्याची प्रथा आजही जपण्यात आली. होळीच्या दिवशी सर्व कोळीबांधव आपल्या बोटींची विधिवत पूजा करून भरतीच्या मुहूर्तावर त्यांची वाजतगाजत समुद्रात मिरवणूक काढली. संध्याकाळी बोटींचे नाखवा व सर्व खलाशी आपल्या कुटुंबासोबत बोटींची आरती करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. बोटीवरील लावलेला मानाचा झेंडा होळी मैदानात असलेल्या होळीला फेरी मारून घरी आणला. हा झेंडा गुढीपाडव्यापर्यंत घरावर फडकत ठेवण्याची परंपरा आजही पाळली जाते.
दरम्यान, मुरूड पोलिस ठाणे हद्दीत सार्वजनिक ठिकाणी ८० तर ४८ खासगी होळ्या शांततेत पेटवण्यात आल्या. कुठेही अनुचित प्रकार झाला नसल्याची माहिती मुरूड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

