हैदराबाद येथे प्रशिक्षणादरम्यान सीआयएसएफ जवानाचा मृत्यू

हैदराबाद येथे प्रशिक्षणादरम्यान सीआयएसएफ जवानाचा मृत्यू

Published on

डोंबिवलीच्या सीआयएसएफ जवानाचे हैदराबादमध्ये निधन
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; प्रशिक्षणादरम्यान हृदयविकाराचा झटका

डोंबिवली, ता. ३ : देशसेवेचे व्रत घेतलेले डोंबिवलीतील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान बसंत सिंग (वय ३५) यांचे हैदराबाद येथे प्रशिक्षणादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर डोंबिवलीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बसंत सिंग हे सीआयएसएफमध्ये कार्यरत होते आणि सध्या प्रशिक्षणासाठी हैदराबाद येथे गेले होते. सराव सुरू असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बसंत सिंग यांचे पार्थिव सोमवारी त्यांच्या डोंबिवलीतील निवासस्थानी आणण्यात आले. सीआयएसएफच्या वतीने त्यांना मानवंदना देण्यात आली. या वेळी शासकीय अधिकारी, दलाचे सहकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘अमर रहे’च्या घोषणा आणि भारावलेल्या वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
बसंत सिंग यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव असलेल्या बसंत यांच्या जाण्याने सिंग कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका कर्तव्यदक्ष जवानाला गमावल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com