कर्मवीरमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

कर्मवीरमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

Published on

कर्मवीरमध्ये राष्ट्रीय विज्ञानदिन साजरा

विरार (बातमीदार) : कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व एस. पी. कनिष्ठ महाविद्यालय जुचंद्र येथे सर चंद्रशेखर वेंकटरामन (रामन इफेक्ट) यांच्या सन्मानार्थ ‘राष्ट्रीय विज्ञानदिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपाली विसावे यांनी केले. पर्यवेक्षिका कविता पाटील यांनी रामन इफेक्ट आणि नोबेल पुरस्कारबद्दल विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. मानसी साळुंखे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे प्राचार्य विलास जगताप यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमासाठी स्मिता पाटील व शिक्षक उपस्थित होते. अंजली भगत यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com