ठाण्यातील बंद कंपन्यांतील कामगारांचा मुद्दा विधानसभेत गाजला

ठाण्यातील बंद कंपन्यांतील कामगारांचा मुद्दा विधानसभेत गाजला

Published on

ठाण्यातील बंद कंपन्यांतील कामगारांचा मुद्दा विधानसभेत गाजला
थकबाकी मिळण्यासाठी लवकरच ठोस उपाययोजना
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : ठाण्यातील बंद कंपन्यांमधील कामगार देशोधडीला लागले, शेकडो मृत्यू पावले, पण त्यांची थकबाकी काही मिळाली नाही. राज्य शासनाने यात हस्तक्षेप करून अशा कामगारांसाठी ठोस उपायोजना राबवण्याची गरज आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली. कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी अशा कंपन्यांसदर्भात लवकरच बैठक घेऊन कामगारांच्या हिताचा निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.
आमदार संजय केळकर यांनी अधिवेशनात ठाण्यातील बंद कंपन्या आणि कामगारांच्या थकबाकीचा मुद्दा उपस्थित केला. ठाण्यातील मफतलाल कंपनी बंद पडली. त्यातील शेकडो कामगार देशोधडीला लागले, मृत्यू पावले पण त्यांची थकबाकी काही मिळाली नाही. इंडियन रबर कंपनीदेखील बंद पडली. या कंपनीची जागा विकण्यात आली. त्यातील काही जमीन महापालिकेने क्लस्टर योजनेसाठी संपादित केली. दरम्यान, यातील २५०-३०० कामगार थकबाकी मिळण्यासाठी लढा देत देत मृत्यूही पावले, तरीही कामगारांना थकबाकी मिळाली नाही. एकूणच कंपन्या बंद होत असताना हजारो कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबांना वाऱ्यावर सोडण्यात आले. त्यांच्यापाठी राज्य सरकारने ठामपणे उभे राहण्याची गरज असून, अशा प्रकरणात राज्य शासनाने हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे मत केळकर यांनी व्यक्त केले. कंपनी बंद पडल्यानंतर कामगारांची थकबाकी दिल्याशिवाय जागा विकता येणार नाही, किंवा त्यावर कोणताही नवीन प्रकल्प उभारता येणार नाही किंवा एखाद्या योजनेसाठी जमीनही संपादित करता येणार नाही, अशी तरतूद करण्याची गरज असून, ठराविक मुदतीतच कामगारांना संपूर्ण थकबाकी मिळावी, अशी ठोस उपाययोजना शासन करणार आहे का, असे प्रश्न केळकर यांनी उपस्थित केले.

विशेष बैठक घेणार
यावर उत्तर देताना कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी अशा बंद कंपन्या आणि कामगार यासंदर्भात लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येईल आणि विहित मुदतीत कामगारांना त्यांची थकबाकी मिळेल, अशी योजना करण्यात येईल, असे फुंडकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com