बस-कार वेल्फेअर असोसिएशनचा आंदोलनाचा इशारा
बस-कार वेल्फेअर असोसिएशनचा आंदोलनाचा इशारा
आमदार मंदा म्हात्रे यांना निवेदन सादर
तुर्भे, ता. ३ (बातमीदार) : बस-कार वेल्फेअर असोसिएशन, नवी मुंबईच्या वतीने सार्वजनिक सेवा वाहतूकदारांवर लागू करण्यात आलेल्या कायदे व नियमांच्या अन्यायकारक अंमलबजावणीविरोधात आमदार मंदा म्हात्रे यांना निवेदन देण्यात आले. ई-चलान प्रणालीतील त्रुटी, पुराव्याविना दंडवसुली, विलंबाने येणारे संदेश व अस्पष्ट छायाचित्रे यामुळे वाहनधारकांची आर्थिक लूट होत असल्याची तक्रार करण्यात आली.
आमदार म्हात्रे यांनी तत्काळ परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून लवकरच बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मिळवले. वाढते इंधन दर, विमा व करभारामुळे वाहतूक व्यवसाय आर्थिक अडचणीत असल्याने कठोर कारवाईऐवजी समुपदेशनाची भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. या वेळी विलासराव हुले पाटील, भास्कर पापडे, विजय कदम, प्रवीण लोकरे व फिरोज मुलानी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

