‘आयएनएसव्ही कौंडिण्य’चे मुंबईत जल्लोषात स्वागत

‘आयएनएसव्ही कौंडिण्य’चे मुंबईत जल्लोषात स्वागत

Published on

‘आयएनएसव्ही कौंडिण्य’चे मुंबईत जल्लोषात स्वागत
मस्कत मोहीम यशस्वी; मान्यवरांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : ओमानमधील मस्कत येथे यशस्वी परदेश प्रवास पूर्ण करून परतलेल्या भारतीय नौदलाचे शिडाचे जहाज ‘आयएनएसव्ही कौंडिण्य’चे सोमवारी (ता. २) मुंबईतील नौदल तळावर संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या उपस्थितीत दिमाखात स्वागत करण्यात आले. भारताच्या प्राचीन सागरी परंपरेचा ठसा उमटवणारी ही मोहीम युवा पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
‘कौंडिण्य’चा हा पहिला परदेश प्रवास भारताच्या प्राचीन सागरी ज्ञानपरंपरेच्या पुनरुज्जीवनाचे प्रतीक असल्याचे सेठ यांनी नमूद केले. या मोहिमेत दिसून आलेले धाडस, चिकाटी आणि शोधक वृत्ती नव्या पिढीला साहस व नवोन्मेषासाठी प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सांस्कृतिक आत्मविश्वासाच्या बळावर नवे प्रयोग करण्याचे आवाहनही त्यांनी युवकांना केले. पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामिनाथन यांनीही मोहिमेतील नौदल पथकाचे कौतुक केले. संकल्पना मांडण्यापासून संशोधन, आरेखन, पारंपरिक जहाजबांधणी, कर्मचारी प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष समुद्रप्रवासापर्यंत पथकाने घेतलेले परिश्रम उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. पारंपरिक पद्धतीने बांधलेली लाकडी नौका आधुनिक तांत्रिक बळकटीशिवाय समुद्रात चालवणे हे मोठे आव्हान मानले जाते; मात्र काटेकोर नियोजन, उत्कृष्ट नौकानयन कौशल्य आणि संघभावना यांच्या बळावर ‘कौंडिण्य’ने हा प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यामुळे भारतीय नौदलाच्या सागरी कौशल्याची पुन्हा एकदा प्रचीती आली.
...
जलसलामीत स्वागत
भारतामध्ये परतल्यानंतर ‘कौंडिण्य’चे नौकांच्या दिमाखदार संचलनाने आणि पारंपरिक जलसलामीने स्वागत करण्यात आले. नौदल तळावर उत्साह आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते. या कार्यक्रमाला मुंबईतील ओमानचे महावाणिज्यदूत महबूब इस्सा अलरैसी, वरिष्ठ व निवृत्त नौदल अधिकारी, ‘होडी इनोव्हेशन्स’चे प्रतिनिधी, समाजातील मान्यवर, खलाशी समुदायातील सदस्य, ऐतिहासिक तज्ज्ञ आणि नौकानयनप्रेमी उपस्थित होते.
...
प्राचीन तंत्रज्ञानाचा ठसा
२० मीटर लांबीची ‘कौंडिण्य’ ही पारंपरिक पद्धतीने बांधलेली लाकडी नौका असून तिची रचना अजिंठा लेणी येथील पाचव्या शतकातील शिल्पांपासून प्रेरित आहे. प्राचीन भारतीय जहाजबांधणी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या नौकेत लाकडी फळ्या दोरखंडांच्या साहाय्याने जोडण्यात आल्या असून, त्यांना नैसर्गिक चिकट द्रव्यांनी अधिक मजबूत करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com