सारसोळे कोळीवाडा बसथांब्याच्या नुतनीकरणाची मागणी

सारसोळे कोळीवाडा बसथांब्याच्या नुतनीकरणाची मागणी

Published on

सारसोळे कोळीवाडा बस थांब्याच्या नुतनीकरणाची मागणी
नेरूळ, ता. ३ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर आठमधील सारसोळे कोळीवाडा बस थांब्याची झालेली दुरवस्था लक्षात घेता त्याचे तातडीने नूतनीकरण करण्यात यावे, अशी लेखी मागणी युवासेनेचे नवी मुंबई सरचिटणीस निखिल मांडवे यांनी परिवहन महाव्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाकडून स्व. राजीव गांधी उड्डाणपुलावरून सारसोळे बस डेपोकडे वळसा घेतल्यावर समाधान बारलगत हा बस थांबा आहे. सध्या बसथांब्याला केवळ सांगाड्याचे स्वरूप आले असून, पावसाळ्यात गळती होते. प्रवाशांना उभे राहण्यासाठी सुरक्षित आसरा उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या बस थांब्याच्या नूतनीकरणासाठी माजी नगरसेविका सुनीता रतन मांडवे यांनीही पाठपुरावा केला आहे. परिसरातील इतर बस थांबे सुस्थितीत असताना केवळ या बस थांब्याची दुरवस्था असल्याने प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com