टॉरेंट इलेक्ट्रिकल्सचा एफएमईजी क्षेत्रात विस्तार
टॉरंट इलेक्ट्रिकल्सचा एफएमईजी क्षेत्रात विस्तार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : टोरंट इलेक्ट्रिकल्सने आपल्या वायर आणि स्विचगियर उत्पादन संचाच्या महाराष्ट्रातील वार्षिक विस्ताराची घोषणा केली. कंपनीच्या राष्ट्रीय विस्तार धोरणातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. फास्ट मूव्हिंग इलेक्ट्रिकल गुड्स (एएमईजी) क्षेत्रात सुरक्षितता, विश्वासार्हता आणि भविष्यातील वीज वापराच्या गरजांवर भर देण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
टोरंटने वायर आणि स्विचगियर उत्पादनांची विस्तृत मालिका बाजारात आणली आहे. यामध्ये एफआर, एसएफआर, एफआपएलएसएच आणि एचईएलआर दर्जाच्या वायरसोबतच मिनिएचर सर्किट ब्रेकर (एमसीबी), रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर, आयसोलेटर्स आणि डिस्ट्रीब्युशन बोर्ड यांचा समावेश आहे. या सर्व उत्पादनांची रचना सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह वीजपुरवठा लक्षात घेऊन करण्यात आली आहे. घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी ती उपयुक्त ठरणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

