दिवाळे कोळीवाड्यात पारंपरिक लंगोटी क्रिकेट स्पर्धा

दिवाळे कोळीवाड्यात पारंपरिक लंगोटी क्रिकेट स्पर्धा

Published on

दिवाळे कोळीवाड्यात पारंपरिक लंगोटी क्रिकेट स्पर्धा
तुर्भे, ता. ३ (बातमीदार) : नवी मुंबईतील दिवाळे कोळीवाडा येथे होळी उत्सवानिमित्त पारंपरिक ओव्हरआर्म लंगोटी क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली. आधुनिकतेच्या काळातही परंपरेचे जतन करत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला परिसरातील नागरिकांनी मोठी उपस्थिती लावली. गावच्या मातीत रंगलेल्या या स्पर्धेत तब्बल १३ संघ सहभागी झाले होते.
सर्व खेळाडूंनी डोक्यावर लाल टोपी आणि कमरेला सुरका परिधान करून पारंपरिक कोळी वेशभूषेत सामने खेळले. त्यामुळे संपूर्ण स्पर्धेला वेगळीच रंगत प्राप्त झाली. प्रसिद्ध पंचांच्या उपस्थितीत सामने शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. मे. अक्षय डेव्हलपर्सचे सोमनाथ देवकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा यंदा १८ व्या वर्षात पदार्पण करत आहे.
ही स्पर्धा केवळ क्रीडा उपक्रम नसून आगरी-कोळी समाजाच्या सांस्कृतिक जतनाची ओळख ठरली. नवतरुणांनी मैदानी खेळांची परंपरा जपावी आणि मोठ्या पातळीवर झेप घ्यावी, असा संदेश आयोजक सोमनाथ देवकर यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com