विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Published on

विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पालघर (बातमीदार) : भगिनी समाज संस्था संचालित प्राथमिक विद्यामंदिर विभागाच्या वतीने विज्ञान दिनानिमित्त शनिवारी (ता. २८) विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, प्रयोग साहित्याची मांडणी करता यावी, तसेच सादरीकरण, पदार्थाचे गुणधर्म, नावीन्यपूर्ण संकल्पना, दैनंदिन जीवनातील उपयोग, श्रम व वेळेची बचत आणि विद्यार्थ्यांनी केलेली नावीन्यपूर्ण कलाकृती राष्ट्रासाठी उपयोगी व्हावी, ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून मुख्याध्यापिका प्रीती वर्तक यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील शिक्षकांनी प्रयोगांचे मूल्यमापन करून क्रमांक देत विजेते घोषित केले. या प्रदर्शनात इयत्ता सहावी व सातवीच्या वर्गातील एकूण ४८ प्रयोग मांडले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com