वर्षभरात हजारो भंगार वाहनांवर कारवाई
वर्षभरात हजारो भंगार वाहनांवर कारवाई
स्वच्छता मोहिमेला वेग
तुर्भे, ता. ३ (बातमीदार) : शहर स्वच्छ आणि सुबक राखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने भंगार अवस्थेत रस्त्यांवर टाकून दिलेल्या वाहनांविरोधात व्यापक मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. गेल्या वर्षभरात पालिकेच्या आठही विभाग कार्यक्षेत्रात तब्बल एक हजारहून अधिक भंगार वाहनांवर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे २०२६ च्या पहिल्याच महिन्यात ५३ वाहने उचलून क्षेपणभूमीत जमा करण्यात आल्याने मोहिमेला अधिक गती मिळाल्याचे दिसून येत आहे. सर्वाधिक भंगार वाहने कोपरखैरणे परिसरात आढळून आली आहेत.
शहरातील विविध नोड्समध्ये अनेक वाहने महिनोनमहिने रस्त्याच्या कडेला भंगार अवस्थेत उभी राहत होती. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांना साफसफाई करताना अडथळे येत होते. वाहनांच्या खाली कचरा साचून अस्वच्छता वाढत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर अतिक्रमण विभागाने विशेष मोहीम हाती घेत संबंधित वाहनांचे सर्वेक्षण केले. प्रत्येक वाहनावर २४ तासांची नोटीस चिकटविण्यात आली. नोटीसकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनमालकांची वाहने टोइंगद्वारे उचलून पालिकेच्या क्षेपणभूमीत जमा करण्यात आली.
आयुक्त डॉ. कैलास शिंदे व अतिरिक्त आयुक्त डॉ. कैलास देठे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी असून, नागरिकांनी सहकार्य केल्यास शहराला राष्ट्रीय स्तरावर मानांकन मिळू शकते, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.
चौकट :
विभागनिहाय कारवाई (जानेवारी-डिसेंबर २०२५)
बेलापूर - ५७
नेरूळ - ११८
वाशी - ९९
तुर्भे - १३५
कोपरखैरणे - ४३०
घणसोली - १६६
ऐरोली - १२
दिघा - ०२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

