पार्ले-जीचा कंटेनर खारेगाव टोलनाक्याजवळ उलटला;

पार्ले-जीचा कंटेनर खारेगाव टोलनाक्याजवळ उलटला;

Published on

पार्ले-जीचा कंटेनर खारेगाव टोलनाक्याजवळ उलटला
डिझेल सांडल्याने वाहतुकीवर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : नाशिक-मुंबई महामार्गावरील खारेगाव टोलनाक्याजवळ मंगळवारी (ता. ३) पहाटेच्या सुमारास पार्ले-जी बिस्कीट घेऊन जाणारा कंटेनर उलटल्याची घटना समोर आली. या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही; मात्र डिझेल सांडल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला. यामुळे काही काळ वाहतूक धिम्या गतीने सुरू होती.
रमेश झगडे यांच्या मालकीचा हा कंटेनर चालक रईस अहमद चालवित होते. रईस हे २० टन पार्ले-जी बिस्किटांचा माल घेऊन नाशिकहून न्हावा शेवा (नवी मुंबई)कडे निघाले होते. खारेगाव टोलनाक्याजवळ एका वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर अचानक रस्त्यावर उलटला. अपघातानंतर कंटेनरच्या डिझेल टाकीतून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल सांडले. यामुळे घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला याची सूचना दिली.

वाहतुकीवर परिणाम
अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी रस्त्यावर पसरलेल्या डिझेलवर माती टाकून संभाव्य मोठा धोका वेळीच टाळला. अपघातामुळे नाशिककडून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी धीम्या गतीने सुरू होती. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर रस्त्याच्या एका बाजूला घेण्यात आला. त्यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे मोकळा करण्यात आला, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com