बी. के. बिर्ला महाविद्यालयात मराठी भाषा गौरवदिन
बिर्ला महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’
चार हजार विद्यार्थ्यांची ग्रंथदिंडी; पारंपारिक खेळांचेही सादरीकरण
कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : मराठी भाषेचा अभिमान आणि संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने, कल्याणमधील बी. के. बिर्ला महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. महाविद्यालयाच्या मुख्य ग्रंथालयापासून माहिती तंत्रज्ञान इमारतीपर्यंत काढण्यात आलेल्या भव्य ग्रंथदिंडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
ग्रंथदिंडीत वारकरी, गोंधळी, भजनी मंडळ आणि लेझीम पथकासह सुमारे तीन ते चार हजार विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. दिंडीमध्ये ढोल-ताशा, हलगी आणि संबळ या वाद्यांच्या गजराने परिसर दणाणून गेला होता. लाठीकाठी, दांडपट्टा यांसारख्या मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, तसेच योगा आणि कुस्तीची कौशल्ये विद्यार्थ्यांनी सादर केली. संस्थेचे उपाध्यक्ष सुबोध दवे, शिक्षण संचालक डॉ. नरेशचंद्र आणि प्राचार्य डॉ. अविनाश पाटील यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले.
मुख्य सोहळ्याचे उद्घाटन कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाले. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले पद्मश्री भिकल्या लाडक्या धिंडा यांचा विशेष सन्मान करण्यात आला. आपल्या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले, कोणतेही काम मनापासून केले की ते पूर्णत्वास जाते. आपली पारंपरिक कला आणि संस्कृती टिकली, तरच आदर्श समाज आणि सामर्थ्यवान देश घडेल. त्यांनी सादर केलेल्या ‘तारपा’ या लोककलेने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
मराठी साहित्याचा जागर
मराठी विभागप्रमुख डॉ. सीताराम म्हस्के यांनी प्रास्ताविकात मराठी भाषेच्या समृद्ध वारशाचा आढावा घेतला. ‘‘मराठी भाषा अधिक समृद्ध करण्याची जबाबदारी युवा पिढीची आहे,’’ असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचा परिचय डॉ. दौलतराव कांबळे यांनी करून दिला. या सोहळ्यास उपप्राचार्य डॉ. मनिदर कौर, डॉ. महादेव यादव, डॉ. लक्षिता सोनी, डॉ. मेघा देवळे, डॉ. प्रतिभा गाढे, डॉ. ग्रीष्म खोब्रागडे, डॉ. सुवर्णा जाधव, प्रा. शीतल चित्रे यांच्यासह मोठ्या संख्येने प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

