रुद्र फाउंडेशनतर्फे आरोग्य तपासणी
रुद्र फाउंडेशनतर्फे आरोग्य तपासणी
भाईंदर (बातमीदार) : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या मिरा-भाईंदरमधील रुद्र फाउंडेशनतर्फे सलग सहाव्या वर्षी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ८३ पिशव्या रक्ताचे संकलन करण्यात आले. रक्तदान शिबिरासोबतच वोकहार्ट रुग्णालयाच्या सहकार्याने आरोग्य तपासणी आणि डॉ. आरती वाडकर यांच्यातर्फे मोफत दंततपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिर यशस्वी करण्यासाठी रुद्र फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत खोत, उपाध्यक्ष वंदना जोशील, सचिव प्रशांत कोळपे, खजिनदार अमेय हडकर तसेच सदस्य घनश्याम सिंह, किरण गेडाम, हरेश अग्रवाल, राहुल मोरे, अरुण पायस, गणेश मयेकर, सिकंदर अरोरा, रजनीश कुमार, मनीष राऊत यांनी मोलाचे सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

