पोलिस पाटील सुनिल महाबळे यांचा प्रामाणिकपणा,रस्त्यात सापडलेला मोबाईल केला परत

पोलिस पाटील सुनिल महाबळे यांचा प्रामाणिकपणा,रस्त्यात सापडलेला मोबाईल केला परत

Published on

१५ हजारांचा मोबाईल मालकाला परत
रोहा, ता. ३ (बातमीदार) ः पाले बुद्रुक येथील पोलिस पाटील सुनील महाबळे यांनी आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवून एक आदर्श प्रस्थापित केला आहे. रस्त्यात सापडलेला १५ हजार रुपये किमतीचा मोबाईल त्यांनी शोध घेऊन त्याच्या मालकाला सुखरूप परत केला आहे.
पाले बुद्रुक येथील सुनील महाबळे हे दुचाकीवरून कोलाड बाजारपेठेत जाण्यासाठी प्रवास करीत होते. सुनील हे आंबेवाडी गावाच्या थांब्याजवळ आले असता त्यांना रस्त्यावर मोबाईल दिसला. सुनील महाबळे यांनी दुचाकी थांबवून तो मोबाईल आपल्या ताब्यात घेतला आणि मोबाईलवरून कॉल करून शोधण्याचा प्रयत्न करीत होते. त्या वेळी हा मोबाईल श्रुतिक महाबळे याचा असल्याचे समजले. सुनील यांनी तो मोबाईल सुखरूप श्रुतिकला सोपवला. या वेळी चंद्रकांत लोखंडे, गणेश शिंदे, जगदीश परबलकर, संदीप माने, उत्तम ठोंबरे, शुभम सिंग आदी उपस्थित होते. या वेळी सर्वांनी त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com