माणगावच्या हर्षल उभारे यांना फॉरेन्सिक सायन्समध्ये सुवर्ण पदक

माणगावच्या हर्षल उभारे यांना फॉरेन्सिक सायन्समध्ये सुवर्ण पदक

Published on

माणगावच्या हर्षल उभारेला फॉरेन्सिक सायन्समध्ये सुवर्णपदक
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या हस्ते सन्मान; भादाव गावाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
माणगाव, ता. ३ (वार्ताहर) : माणगाव तालुक्यातील भादाव येथील हर्षल शाम उभारे याने फॉरेन्सिक सायन्स या अत्यंत तांत्रिक व जबाबदारीच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत सुवर्णपदक पटकावले. अहमदाबाद (गुजरात) येथे पार पडलेल्या राष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठाच्या चतुर्थ दीक्षान्त समारंभात त्याला हा बहुमान प्रदान करण्यात आला. हा सन्मान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या हस्ते देण्यात आला.
देशभरातील १७९९ पदवीधरांपैकी केवळ ५२ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक मिळाले असून, त्यात हर्षलचा समावेश आहे. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत सातत्यपूर्ण अभ्यास, संशोधन व तांत्रिक प्राविण्याच्या जोरावर त्याने हे यश मिळवले. फॉरेन्सिक सायन्सद्वारे डीएनए परीक्षण, बोटांचे ठसे, रासायनिक व डिजिटल पुराव्यांचे विश्लेषण करून गुन्हे उकलण्यास मदत होते.

चौकट
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श
भादावसारख्या छोट्या गावातून राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक मिळवणे ही केवळ वैयक्तिक कामगिरी नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आशादायी संदेश आहे. मर्यादित साधनसंपत्ती असूनही जिद्द, परिश्रम आणि योग्य दिशादर्शनाच्या जोरावर मोठी शैक्षणिक भरारी घेता येते, याचे हर्षल उभारे हे ठळक उदाहरण ठरले आहे.

फोटो ओळ – हर्षल उभारेला सुर्य कांत यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com