मेघवाडी सर्वोदयनगर येथे होळी दहन उत्साहात

मेघवाडी सर्वोदयनगर येथे होळी दहन उत्साहात

Published on

मेघवाडी सर्वोदयनगर येथे होळी दहन उत्साहात; धुळवडीची जल्लोषात सुरुवात
जोगेश्वरी, ता. ३ (बातमीदार) : जोगेश्वरी पूर्व येथील मेघवाडी सर्वोदयनगर परिसरातील दत्त मंदिरात श्री दत्त रिलिजिअस अ‍ॅण्ड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने होळी दहनाचा कार्यक्रम विधिवत पूजेसह उत्साहात पार पडला. परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने होळी प्रज्वलित करण्यात आली.
या वेळी ट्रस्टचे कार्यकर्ते प्रशांत परब यांच्या हस्ते होळीची पूजा करण्यात आली. होळी उभारणीसाठी आदल्या दिवशीच सुकलेली झाडे, नारळाच्या झावळ्या, पतंग, पारंपरिक शेण्या तसेच टाकाऊ वस्तूंचे थर रचून होळी उभी करण्यात आली होती. रात्री होळी दहनावेळी महिला व पुरुषांनी मोठी गर्दी केली होती. सर्वांनी भक्तिभावाने पूजा करून होळीचे दर्शन घेतले. दरम्यान, अलर्ट सिटीजन फोरमच्या वतीने “एक पोळी होळीच्या सामाजिक जाणिवेची” हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी विशेष बॉक्स ठेवण्यात आला होता. होळीच्या पूजेच्या साहित्याबरोबरच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पुरणपोळ्या या बॉक्समध्ये ठेवून सामाजिक बांधिलकी जपली.
होळी दहनानंतर काही वेळातच परिसरात धुळवडीची सुरुवात झाली. एमएचबी कॉलनी तसेच आसपासच्या गल्लीबोळांत तरुणाईसह लहान मुले-मुलींनी एकमेकांवर रंगीत फुगे फोडत व पिचकाऱ्यांतून रंग उडवत धुळवडीचा आनंद लुटला. संपूर्ण परिसरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
धार्मिक परंपरा आणि सामाजिक जाणीव यांचा संगम साधत होळी व धुळवडीचा दुहेरी उत्सव मेघवाडी सर्वोदयनगरमध्ये जल्लोषात साजरा करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com