खारघरवासीयांची ‘पाण्याशिवायच्या होळी’ला पसंती
खारघरवासीयांची ‘पाण्याशिवाय होळी’ला पसंती
पर्यावरणपूरक उपक्रमांना प्राधान्य; सिडकोचे पाणी जपून वापरण्याचे आवाहन
खारघर, ता. ३ (बातमीदार) : वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खारघर परिसरातील नागरिकांनी यंदा ‘पाण्याशिवाय होळी’ साजरी करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला. कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, वाढते तापमान आणि साठ्यांवरील ताण यामुळे अनेक गृहनिर्माण संस्थांनी पाण्याचा अपव्यय टाळत नैसर्गिक गुलालाने धुळवड साजरी केली.
दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाण्याची उधळण होत असताना, यंदा मात्र सोसायट्यांनी स्पीकरवर होळीगीतांचा आनंद घेत सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्यस्पर्धा आणि मुलांसाठी पारंपरिक खेळांचे आयोजन केले. होळी आनंदाची; पण पाण्याची नासाडी नको, अशी भूमिका रहिवाशांनी मांडली. सिडको प्रशासनानेही पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. काही भागांत टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने परिस्थिती गंभीर आहे.
दरम्यान, खारघर सेक्टर २०-२१ परिसरात भाजपाच्या वतीने शिल्प चौक येथे ‘रंगोत्सव’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नगरसेविका परेशा पटेल तसेच प्रवीण पाटील, मधू पाटील व अनिता पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
एकूणच, खारघरकरांचा ‘पाण्याशिवाय होळी’चा निर्णय पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने सकारात्मक पाऊल मानला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

