बंजारा समाजाकडून धुळवड साजरी

बंजारा समाजाकडून धुळवड साजरी

Published on

बंजारा समाजाकडून धुळवड साजरी
खारघर, ता. ३ (बातमीदार) : खारघर, कामोठे, तळोजा व पनवेल परिसरात वास्तव्यास असलेल्या बंजारा समाजबांधवांनी होळी व धुळवड हा सण अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला. रंगांची उधळण, पारंपरिक नृत्य, लेंगी गीतांचा गजर आणि सामूहिक सहभाग यामुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.
खारघर, तळोजा आणि कामोठे भागात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असलेल्या बंजारा समाजाची सांस्कृतिक परंपरा या सणातून प्रकर्षाने दिसून आली. स्त्री-पुरुषांनी पारंपरिक वेशभूषेत गोलाकार फेर धरत डफ वाजवत नृत्य केले. होळी हा सण केवळ रंगांचा उत्सव नसून सामाजिक एकात्मता आणि परंपरेचे जतन करण्याचे प्रतीक असल्याचे या वेळी अधोरेखित झाले.
खारघरमधील समाजसेवक रोहिदास जाधव यांनी सांगितले की, धुळवडला बंजारा समाजात ‘धुंड’ म्हणून ओळखले जाते. या दिवशी गेल्या १२ महिन्यांत जन्मलेल्या बालकांवर विशेष संस्कार केले जातात. मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात यासाठी समाज एकत्र येऊन विधी करतो. या परंपरेतून योग्य मार्गाने जीवन जगण्याचा संदेश दिला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com