अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक

अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक

Published on

वाशीत अतिक्रमणविरोधी पथकावर दगडफेक
नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : नवी मुंबईतील वाशी परिसरात महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना सोमवारी रात्री (ता. २) घडली. नवी मुंबई महापालिकेच्या पथकावर १० ते १५ जणांच्या जमावाने दगडफेक आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला चढवला. या प्रकारात काही कर्मचारी जखमी झाले असून, वाशी पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशी सेक्टर ३० येथील हायवे ब्रिजखाली अनधिकृत फेरीवाल्यांची मोठी गर्दी होत असल्याने वरिष्ठ लिपिक विजय पाटील हे सोमवारी (ता. २) रोजी सायंकाळी ८ च्या सुमारास पथक, सुरक्षा रक्षक आणि कामगारांसह अतिक्रमण हटवण्यासाठी गेले होते. कारवाई सुरू होताच काहींनी सरकारी कामात अडथळा आणत पथकाला विरोध केला आणि अचानक दगडफेक सुरू केली. काहींनी लाकडी दांडक्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. दत्ता धुळे, सुजित गुप्ता, मिथुन झा आणि प्रकाश गावडे हे कर्मचारी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जमाव पांगला. भारतीय न्याय संहिता २०२३च्या संबंधित कलमांनुसार १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून हल्ल्यात वापरलेले दगड व दांडके जप्त करण्यात आले असून, संशयितांचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com