पनवेलमध्ये पारंपरिक होलिकोत्सवाची परंपरा कायम
पनवेलमध्ये पारंपरिक होलिकोत्सवाची परंपरा कायम
शिमग्याच्या सोंगांनी वेधले लक्ष
पनवेल, ता. ३ (बातमीदार) : पनवेल शहरातील लाइनआळी परिसरात दरवर्षी साजरा होणाऱ्या पारंपरिक होलिकोत्सवाने यंदाही जुन्या आठवणींना उजाळा दिला. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा आजही तेवढ्याच उत्साहात आणि एकजुटीने साजरी होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
लाइनआळीतील होलिकोत्सव हा केवळ सण नसून एक सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा मानला जातो. लहानपणापासून पाहत आलेली ही परंपरा नव्या पिढीनेही तितक्याच अभिमानाने आणि जबाबदारीने जपली आहे. यामुळे जुन्या आणि नव्या पिढीतील सुसंवाद अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून आले.
यंदाच्या होळीतील विशेष आकर्षण म्हणजे पारंपरिक वेशभूषा आणि शिमग्याची सोंगे. गावातील तरुणांनी पारंपरिक पोशाख परिधान करून विविध सोंगे सादर केली. शिमग्याच्या सोंगांमधून लोककला, विनोद, सामाजिक संदेश आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडले. ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक गाण्यांच्या तालावर सोंगांचे सादरीकरण होत असल्याने वातावरण अधिकच रंगतदार झाले. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी या सोंगांचा मनमुराद आनंद घेतला.
होलिका दहन आणि त्यानंतर रंगोत्सवाच्या निमित्ताने परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक पद्धतीने सण साजरा करताना शिस्त, एकता आणि उत्साह यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
लाइनआळीतील मित्रमंडळी आणि रहिवाशांनी या परंपरेचे जतन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. आपल्या संस्कृतीची ओळख जपणारी ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत अशीच टिकून राहो, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
या उत्सवामुळे लाइनआळी परिसरातील ऐक्य, संस्कृतीप्रेम आणि सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

