होळीत प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर
होळीत प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर
पनवेल महापालिका क्षेत्रातील वसाहतींमध्ये पिशव्यांचा खच
प्लॅस्टिकबंदीच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह
पनवेल, ता. ३ (बातमीदार) : होळीचा सण उत्साहात पार पडला असला, तरी पनवेल महापालिका क्षेत्रात सिंगल युज प्लॅस्टिक पिशव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचे चित्र समोर आले आहे. प्लॅस्टिकबंदीबाबत जनजागृती आणि कारवाईचे दावे होत असतानाही पाण्याने भरलेल्या पातळ प्लॅस्टिक पिशव्या मोठ्या प्रमाणात वापरल्या गेल्या. परिणामी अनेक वसाहती, सोसायट्या आणि गल्लीबोळांत या पिशव्यांचा अक्षरशः खच पडलेला दिसून आला.
गेल्या दहा-पंधरा दिवसांपासून लहान मुले पाण्याच्या पिशव्या एकमेकांवर तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर फेकताना दिसत होती. अतिशय हलक्या व पातळ असल्याने या पिशव्या वाऱ्याने उडून गटारे, नाले व जलवाहिन्यांमध्ये अडकल्या. काही भागांत गटारे तुंबल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत.
कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी, नवीन पनवेल, खारघर आदी भागांत टपर्या, हातगाडी विक्रेते व रंग-पिचकारी विक्रीच्या दुकानांत अशा पिशव्या सहज उपलब्ध असल्याचे दिसून आले. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी प्लॅस्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी व दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

