उरण तालुक्यात होळी-धुलीवंदनाचा पारंपरिक जल्लोष
उरण तालुक्यात होळी-धूलिवंदनाचा पारंपरिक जल्लोष
आगरी, कोळी, कराडी समाजाचा उत्स्फूर्त सहभाग; ढोल-ताशांच्या गजरात होळी प्रज्वलित
उरण, ता. ३ (वार्ताहर) : उरण तालुक्यात होळी आणि धूलिवंदन उत्सव पारंपरिक रीतीरिवाजांसह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण भागात आगरी, कोळी, कराडी समाजासह सर्व स्तरांतून नागरिकांनी सहभाग नोंदवत सणाची परंपरा जपली. गावागावांत होळीची उभारणी विधिवत करण्यात आली. सावरीचे झाड युवकांनी जंगलातून आणून पताका व सजावटीने सुशोभित केले. महिलांनी दिवसभर पूजा-अर्चा केली, तर नवविवाहित जोडप्यांनी पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहून मंगलकामना व्यक्त केल्या.
कोळीबांधवांमध्ये विशेष उत्साह पाहावयास मिळाला. अनेकांनी समुद्रातील बोटी किनाऱ्यावर आणून सण साजरा केला. रात्री १२ वाजता पालापाचोळा व पेंढ्याच्या सहाय्याने होळी प्रज्वलित करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात परिसर दणाणून गेला.
धूलिवंदनाच्या दिवशी ‘खेळ मागणे’ ही परंपरा जपली गेली. लहान मुले सोंग काढून घराघरांतून पारंपरिक म्हणी म्हणत फिरली. काही ठिकाणी रासायनिक रंगांचा वापर झाल्याचे दिसून आले असले, तरी पर्यावरणपूरक रंगांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. एकूणच, सामाजिक एकात्मतेच्या वातावरणात उरण तालुक्यात सण शांततेत व जल्लोषात पार पडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

