कांदिवली अग्निशमन केंद्रात पारंपरिक होळी उत्सव
कांदिवली अग्निशमन केंद्रात पारंपरिक होळी उत्सव
कांदिवली, ता. ३ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिमेतील कांदिवली अग्निशमन केंद्रत पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा करण्यात आला. सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी मिलिंद दोंडे, वरिष्ठ केंद्र अधिकारी संदीप सोनवणे आणि अमित पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उत्सवात भाग घेतला.
उत्सवात होळीला अग्नी देऊन पूजन केले गेले आणि रांगोळी सजवण्यात आली. अग्नी देवतेला श्रीफळ अर्पण करून मुंबईत आग लागू नये आणि जीवितहानी टाळता यावी, यासाठी प्रार्थना करण्यात आली. जवानांच्या कुटुंबीयांनी पोळी, लसूण, खोबरे व पेढ्याचा प्रसाद वाटला.
मुंबईत आग लागण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन अधिकारी आणि जवान सतत तत्पर असतात. या पारंपरिक उत्सवात त्यांनी आपल्या कुटुंबीयांसह आनंदाने होळी साजरी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

