अल्पवयीन मुलासोबत अमानुष प्रकार
अल्पवयीन मुलासोबत अमानुष प्रकार
उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : उल्हासनगरात एका अल्पवयीन मुलासोबत घडलेल्या संतापजनक आणि लज्जास्पद प्रकारामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहाड फाटक परिसरात घरासमोर मित्रांसोबत खेळत असताना १३ वर्षीय मुलाची चड्डी खाली ओढून त्याचा मोबाईलवर व्हिडिओ काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, २८ फेब्रुवारीला रात्री १३ वर्षीय मुलगा घराबाहेर मित्रांसोबत खेळत होता. त्यावेळी रियाज अल्लाउद्दीन शेख (२१, रा. गुलशननगर, उल्हासनगर-१) हा मागून येऊन मुलाची चड्डी खाली ओढत त्याची चेष्टा करू लागला. त्याच्या मित्राने या प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. अपमानास्पद प्रसंगामुळे मुलगा रडू लागला. घटनेची माहिती मिळताच १६ वर्षीय मोठ्या भावाने आरोपीला जाब विचारला असता, त्याने त्याच्यावर हात उगारून मारहाण केली. वडिलांनी हस्तक्षेप केला असता त्यांनाही धक्का देत धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कुटुंबीयांनी तत्काळ ११२ वर संपर्क साधला. पोलिस येईपर्यंत आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

