ठाण्यात पार्किंगमधील चारचाकी वाहनांना आग

ठाण्यात पार्किंगमधील चारचाकी वाहनांना आग

Published on

ठाण्यात दोन आलिशान गाड्यांना आग
ठाणे, ता. ४ : घोडबंदर रोडवरील मानपाडा परिसरात असलेल्या नेप्रो मैदानामध्ये बुधवारी (ता. ४) सकाळी पार्क केलेल्या दोन आलिशान चारचाकी वाहनांना अचानक आग लागली. या आगीत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. मैदानातील उभ्या वाहनांतून धूर निघत असल्याचे संकेत नावाच्या एका दक्ष नागरिकाच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
अमृता मधुकर गाडे यांच्या मालकीची कार या आगीत पूर्णपणे खाक झाली. शेजारीच उभी असलेली संदीप जाधव यांच्या मालकीच्या कारचेही आगीमुळे नुकसान झाले आहे. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक नागरिकांच्या मदतीने अग्निशमन दलाने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com