मानकोली पुलावर अपघातग्रस्ताची सोनसाखळी चोरीला

मानकोली पुलावर अपघातग्रस्ताची सोनसाखळी चोरीला

Published on

मानकोली पुलावर अपघातग्रस्ताची सोनसाखळी चोरीला
सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक; विष्णुनगर पोलिसांची कामगिरी
डोंबिवली, ता. ४ ः एकीकडे अपघातग्रस्ताला वाचवण्यासाठी धडपड सुरू असताना, दुसरीकडे त्याच्या असहायतेचा फायदा घेत सोन्याची चेन चोरणाऱ्या एका नराधमाला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. सतीश दादा कोरे (२४) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

डोंबिवली पश्चिमेकडील ‘गरीबाचा वाडा’ परिसरात राहणारे तुषार सुनील शिंदे यांचा २५ फेब्रुवारीला मानकोली पुलावर भीषण अपघात झाला होता. त्यांना जखमी अवस्थेत शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यासाठी काही जणांनी मदत केली; मात्र याच गर्दीचा फायदा घेत सतीश कोरे याने शिंदे यांच्या गळ्यातील ४२ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लांबवली.

अपघातग्रस्ताची चेन चोरीला गेल्याचे उघड होताच विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आजदे गाव (डोंबिवली पूर्व) येथून सतीश कोरेला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याच्याकडून चोरीची चेन जप्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com