प्रशासकांच्या चौकशीसाठी चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती

प्रशासकांच्या चौकशीसाठी चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती

Published on

खारघर, ता. ४ (बातमीदार) : सिडकोच्या बेलापूर येथील निबंधक सहकारी संस्थेच्या कार्यालयातील कथित भ्रष्टाचाराविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या वतीने करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला यश आले आहे. प्रशासकांच्या अतिरिक्त मानधन आणि आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यासाठी ठाणे शहर उपनिबंधकांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करून दोन महिन्यांत अहवाल देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

बेलापूर येथील सिडकोच्या निबंधक कार्यालयासंदर्भातील विविध मागण्यांसाठी २३ फेब्रुवारीपासून सिडकोच्या अर्बन हटमध्ये माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या वतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले होते. सिडकोच्या सहनिबंधक सहकार कार्यालयाने प्रशासकांच्या अतिरिक्त मानधन आणि आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यासाठी ठाणे शहर उपनिबंधक अविनाश भागवत यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच अतिरिक्त मानधन घेतल्याचे आढळून आल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. निवडणुका जाहीर केलेल्या ७२ सोसायट्यांवर नियुक्त केलेल्या प्रत्येक निवडणूक अधिकारी यांच्या नियुक्ती आदेशाच्या प्रती ५ मार्चला तक्रारदारांना दिले जाईल, दप्तर ताबा अप्राप्त सोसायट्यांवर कलम ८९ची कारवाई करून कागदपत्रे २० मार्चपर्यंत दिली जातील, तसेच यापुढे निबंधक कार्यालयातून एक प्राधिकृत अधिकाऱ्यास तीनपेक्षा अधिक सोसायट्यांवर प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com