एपीएमसी परिसरात अमली पदार्थाची विक्री

एपीएमसी परिसरात अमली पदार्थाची विक्री

Published on

नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : एपीएमसी बाजार परिसरात अमली पदार्थाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणाला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. अस्लम उर्फ रोहित सलाम शेख (वय १९) याच्याजवळ असलेला तीन लाख २० हजारांचे हेरॉईन पोलिसांनी जप्त केला आहे.

एपीएमसीमधील सेक्टर १९ मधील एकता नगर झोपडपट्टी, अल मदिना मशिदीजवळ एक तरुण अमली पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती सानपाडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे एपीएमसी पोलिसांच्या पथकाने सोमवारी (ता. ३) दुपारी मशिदीजवळ धाड टाकून अस्लम उर्फ रोहित याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ प्लॅस्टिकच्या पिशवीत ३२ ग्रॅमचा हेरॉईन (गर्द) हा अमली पदार्थ सापडला. त्याला रहीम नावाच्या व्यक्तीने हे हेरॉईन विक्रीसाठी पुरवल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यानुसार पोलिसांनी रहीम याच्यावरही गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com