भिवंडीत शेकडो होळ्या दहन
भिवंडी (बातमीदार) : भिवंडी शहर व परिसरात सोमवारी सायंकाळी होळी दहन, तर मंगळवारी धूलिवंदनाचा रंगोत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहर व ग्रामीण भागात सुमारे २००हून अधिक ठिकाणी होळ्या पेटविण्यात आल्या. मात्र, प्लॅस्टिक बंदी असतानाही अनेक ठिकाणी रंगांनी भरलेले फुगे आणि छोट्या प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर झाल्याने पालिकेचे आदेश धाब्यावर बसविल्याचे चित्र दिसून आले. कासारआळी, नवीचाळ, पद्मानगर, धामणकर नाका, कोंबडपाडा, ब्राम्हण आळी, ठाणगे आळी, पारनाका, बाजारपेठ, कुंभारआळी, भादवड, भोईवाडा आदी भागांत पारंपरिक विधींसह होळी पूजन करण्यात आले. महिलांनी पारंपरिक वेषभूषेत पूजा केली, तर युवकांनी रंगोत्सवात सहभाग घेतला. धूलिवंदनादिवशी काहींनी रासायनिक रंगांची उधळण केली, तर सुजाण नागरिकांनी इको-फ्रेंडली रंगांचा वापर केला. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

