शिवमंदिरात शिवजयंतीनिमित्त कार्यक्रम
भिवंडी, ता. ४ (वार्ताहर) : महाराष्ट्रातील पहिले छत्रपती शिवाजी महाराज मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यातील मराडे पाडा येथील शिवमंदिरात तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त ५ व ६ मार्चला विविध कार्यक्रम होणार आहेत. याबाबतची माहिती शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक राजूभाऊ चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
५ मार्चला सकाळपासून होमहवन, भजन-कीर्तन कार्यक्रम होणार असून, सायंकाळी तुकाराम बीजनिमित्त वारी सोहळा होणार आहे. जिल्ह्यातील वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ६ मार्चला सायंकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंदिर शक्तिपीठाचा प्रथम वर्धापनदिन साजरा होणार आहे. वर्षभरात सुमारे दहा लाख शिवभक्तांनी मंदिराला भेट दिली असून, ५०० शाळांच्या शैक्षणिक सहली येथे आल्या आहेत. रक्तदान शिबिर व प्रबोधनपर उपक्रमही राबविल्याची माहिती देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

