दुबईत अडकलेल्या ५ परिवाराच्या मदतीसाठी उल्हासनगरातील टीम धावली,

दुबईत अडकलेल्या ५ परिवाराच्या मदतीसाठी उल्हासनगरातील टीम धावली,

Published on

उल्हासनगरातील पाच परिवार दुबईत अडकले
मदतीसाठी भाजपच्या पथकाकडून धावपळ; विमानाची सोय

उल्हासनगर, ता. ४ (बातमीदार) : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे पिकनिकला गेलेले उल्हासनगरातील पाच परिवार दुबईत अडकले आहेत. त्यांच्या मदतीला भाजपची टीम धावली असून, त्यांनी कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांचे पीए काळे आणि शासकीय अधिकारी श्वेता बेंद्रे, दुबई समन्वयक राहुल तुळपुळे यांच्याशी समन्वय साधल्याने गुरुवारी या परिवारांसाठी विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

शहरातील विविध भागांतील पाच परिवार २६ फेब्रुवारीला दुबईला पिकनिकला गेले होते; मात्र आखाती देशात युद्ध परिस्थितीमुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून भाजपचे धनंजय बोडारे, परमानंद गेरेजा, भारत बठिजा, दिनेश मिरचंदानी यांनी कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधून उल्हासनगरातील पाच परिवार दुबईत अडकल्याची माहिती दिली. महाजन यांनी त्यांचे पीए काळे यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. काळे यांनी दुबईतील भारताच्या शासकीय अधिकारी श्वेता बेंद्रे, दुबई समन्वयक राहुल तुळपुळे यांच्याशी समन्वय साधण्याचे सांगितल्यावर परमानंद गेरेजा यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यानुसार अडकलेल्यांसाठी चार स्टार हॉटेल पार्क रेगीस, मिना बाजार येथे व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गुरुवारी विमानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून, हे पाच परिवार दुबईतून उल्हासनगरला सुखरूप परत येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com