५०-६० विद्यार्थ्यांची ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक
५०-६० विद्यार्थ्यांची ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक
नगरसेवक गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसह घेतली पोलिस उपायुक्तांची भेट
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : कल्याण-डोंबिवली परिसरात १८ ते १९ वयोगटातील विद्यार्थ्यांना ट्रेडिंगच्या प्रलोभनाने गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. ठगांनी ५० ते ६० विद्यार्थ्यांकडून विविध कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावावर बँक खाती उघडली आणि त्या खात्यांमधून लाखो रुपयांची उलाढाल केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची दखल घेत शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना घेऊन परिमंडळ तीनचे उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थ्यांना त्यांच्या परिचित मित्रांमार्फत ऑनलाइन ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखविण्यात आले. यासाठी बँक खाते उघडण्याची गरज असल्याचे सांगत ५० ते ६० विद्यार्थ्यांकडून आधार कार्ड आणि पॅन कार्डसारखी महत्त्वाची कागदपत्रे घेतली गेली. त्यानंतर संबंधित खात्यांमधून लाखो रुपयांची व्यवहार उलाढाल झाल्याचे दोन वर्षांनी विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना घेऊन परिमंडळ तीनचे उपायुक्त अतुल झेंडे यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या खात्यांचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
-----------
पोलिसांकडून चौकशी सुरू
या वेळी उपायुक्त झेंडे यांनी संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्यांनी कोणत्याही व्यक्तीला आपली वैयक्तिक कागदपत्रे, बँक तपशील किंवा ओटीपी देऊ नयेत, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, कल्याण-डोंबिवली परिसरात अशा प्रकारचे आणखी काही प्रकार घडले आहेत का, याबाबत पोलिस सखोल चौकशी करीत आहेत. एकीकडे या घोटाळ्याचा भांडाफोड करण्याची मागणी फसगत झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

