बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त सहभाग

बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त सहभाग
Published on

बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुलुंड (बातमीदार) : खासदार संजय दिना पाटील यांच्या पुढाकारातून भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रुद्र विद्यानिकेतन आणि द स्कूल ऑफ चेस मास्टर्स यांच्या संयुक्त विद्यमाने भांडुप (पश्चिम) येथील आयडीयूबीएस शाळेत ही स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत मुलुंड, भांडुप, ठाणे, पालघर, रायगड आणि मुंबईतील सुमारे १३० शाळांमधील ३४५ हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. बुद्धिबळामुळे निर्णयक्षमता, एकाग्रता आणि बौद्धिक विकासाला चालना मिळते, असे मत संजय दिना पाटील यांनी व्यक्त केले. स्पर्धेतील विजेते अरिहा देवरुखकर, यश गनिगा, मानक स्वरूप आणि धैर्य जैन यांना त्यांच्या हस्ते तसेच इतर खेळाडूंना नगरसेविका राजोल संजय पाटील यांच्या उपस्थितीत पारितोषिके प्रदान करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com