फळ मार्केटमध्ये गाळ्याबाहेर विक्री

फळ मार्केटमध्ये गाळ्याबाहेर विक्री

Published on

फळ मार्केटमध्ये गाळ्याबाहेर विक्री

व्यापाऱ्यांना नोटिसा देऊन दंडात्मक कारवाई

तुर्भे, ता. ४ (बातमीदार) : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये गाळ्याबाहेर शेतमाल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. बाजार समितीचे सचिव शरद जरे यांच्या आदेशानुसार उपसचिव राजेंद्र कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा अधिकारी संजय तळेकर यांच्या पथकाकडून ही मोहीम राबवली जात आहे.

भाजीपाला मार्केटप्रमाणेच फळ मार्केटमध्येही गाळ्यांव्यतिरिक्त पॅसेज आणि गाळ्याशेजारील मोकळ्या जागेत फळांची विक्री होत असल्याच्या तक्रारी होत्या. काही गाळाधारक व्यापारी त्यांच्या अनुज्ञप्तीवर माल मागवून तो चवली दलालांकडे विक्रीसाठी देत असल्याचे आढळले आहे. संबंधित दलालांकडे बाजार समितीची परवानगी नसतानाही ते पॅसेजमध्ये विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. कागदोपत्री हे दलाल संबंधित व्यापाऱ्यांकडे कामाला असल्याचे दाखवले जात असल्याने कारवाई टळत होती. दरम्यान, अशा प्रकारे महिन्याला २५ ते ३० हजार रुपये भाडे घेतले जात असल्याची चर्चा आहे.

-----------
एक लाख रुपयांचा दंड वसूल

या अनधिकृत विक्रीमुळे पॅसेजमध्ये वावरणे कठीण झाले होते. ग्राहक, माथाडी कामगार आणि इतर घटकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर कारवाईला वेग देण्यात आला. नियमभंग करणाऱ्यांना नोटिसा देऊन दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांत दरमहा सुमारे एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, आज १० व्यापाऱ्यांचे पंचनामे करण्यात आले. त्यापैकी सात जणांकडून ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, तर तिघांचा माल जप्त करण्यात आल्याची माहिती राजेंद्र कोंडे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com