किरकोळ कारणावरून तळोजमध्ये एकाची हत्या, तर दुसरा गंभीर जखमी

किरकोळ कारणावरून तळोजमध्ये एकाची हत्या, तर दुसरा गंभीर जखमी

Published on

किरकोळ कारणावरून तळोज्यात एकाचा खून; दुसरा गंभीर जखमी
पनवेल, ता. ४ (वार्ताहर) : तळोजा एमआयडीसी परिसरात किरकोळ वादातून झालेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. मंगळवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास आयजीपीएल नाक्याजवळ ही घटना घडली. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी वॉचमनला तळोजा पोलिसांनी रात्रीच अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, चेतन काठे हा मित्र विनायक पाटील व साईनाथ पाटील यांच्यासह मोटारसायकलवरून नितळसच्या दिशेने जात असताना रस्त्यावर सायकलने जाणाऱ्या राजू बासुमतारी (२९) याच्याशी संबंधित वॉचमनचा वाद झाला. संतप्त झालेल्या वॉचमनने लोखंडी पाइपने राजूच्या डोक्यावर चार-पाच प्रहार केले. या हल्ल्यात राजूचा जागीच मृत्यू झाला. प्रसंगावधान राखत साईनाथ पाटील यांनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्यावरही पाइपने हल्ला करण्यात आला. ते गंभीर जखमी असून, रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चेतन काठे याने कसाबसा बचाव केला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध खून व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com