आयव्हीएफच्या नावाखाली काळा बाजार;

आयव्हीएफच्या नावाखाली काळा बाजार;

Published on

स्त्रीबीज तस्करीचे धागेदोरे नाशिकपर्यंत

अटक डॉक्टरला पाच दिवसांची पोलिस कोठडी

बदलापूर, ता. ४ (बातमीदार) : बदलापुरातील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली असून, तपासाची व्याप्ती आता थेट नाशिकपर्यंत पोहोचली आहे. या प्रकरणात नाशिकच्या आयव्हीएफ सेंटरशी संबंधित डॉ. अमोल पाटील याला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आंतरराष्ट्रीय रॅकेटच्या शक्यतेने तपास अधिक गतिमान झाला आहे.

बदलापुरात उघडकीस आलेल्या स्त्रीबीज तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत नाशिक येथील डॉ. अमोल पाटील याला अटक केली आहे. बदलापूर येथे सुरू असलेल्या या अवैध धंद्याचे धागेदोरे थेट नाशिकपर्यंत पोहोचल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. आयव्हीएफ सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या या रॅकेटमध्ये सरोगेट मदर आणि स्त्रीबीज पुरवठ्याचे काम एजंटमार्फत केल्याचा प्राथमिक आरोप डॉ. पाटील याच्यावर आहे. या प्रकरणात ही सहावी अटक असून, तपास अधिक व्यापक पातळीवर जात असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

नाशिकमधील मालती आयव्हीएफ सेंटर येथे कार्यरत असलेल्या डॉ. अमोल पाटील याच्यावर गरजू महिलांना पैशांचे प्रलोभन दाखवून एकापेक्षा अधिक वेळा स्त्रीबीज अवैध मार्गाने विकल्याचा संशय आहे. तपासादरम्यान हे संपूर्ण रॅकेट बदलापुरातून चालवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. पाटील याला आज अंबरनाथ न्यायालय येथे हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय
पोलिस कोठडीदरम्यान सरोगसी व आयव्हीएफ क्षेत्रातील काळ्या बाजाराचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील संबंध उघड होण्याची शक्यता पोलिस व्यक्त केली आहे. याआधी या प्रकरणात चार महिला व एका मेडिकल चालकाला अटक करून त्याची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com