अशोक हांडे यांना मारहाण
अशोक हांडे यांना मारहाण
मुंबई, ता. ४ ः पार्किंगवरून झालेल्या वादात ज्येष्ठ कलादिग्दर्शक अशोक हांडे यांना मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या घटनेत ते जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहीनुसार माहीम येथील युनायटेड हाऊस इमारतीच्या कार्यालयात हांडे यांच्यावर प्रथमेश उनफोडे उर्फ बंटीने बॅटने हल्ला केला. हांडे यांच्या मराठी बाणा या कलाकृतीची वाहने अनेक वर्षांपासून युनायटेड हाऊस इमारतीबाहेर पार्क केली जातात. त्या वाहनांच्या पार्किंगचे पैसे हल्लेखोर प्रथमेश मागत होता. त्यासाठी त्याने आधी कार्यालयाची तोडफोड केली आणि हांडे यांच्यावर हल्लाही केला. कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करूनही प्रथमेश ऐकत नव्हता. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे मदत मागितली. माहीम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रथमेशला ताब्यात घेतले. पुढे त्याला अटक करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

