जेद्दाहसाठी आजपासून एअर इंडियाची उड्डाणे
जेद्दाहसाठी आजपासून
एअर इंडियाची उड्डाणे
मुंबई, ता. ४ : जेद्दाह ते दिल्ली आणि मुंबईपर्यंत नियोजित उड्डाणे ५ मार्चपासून सुरू करण्याची घाेषणा एअर इंडियाने बुधवारी केली. पश्चिम आशियातील सद्य:स्थितीवर बारकाईने लक्ष असल्याचे एअरलाइन्सने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. सध्याच्या परिस्थितीचा काळजीपूर्वक आढावा घेतल्यानंतर ५ मार्चला रात्री ११.५९ वाजेपर्यंत पश्चिम आशियातील आमची बहुतांश उड्डाणे स्थगित राहणार आहेत. ५ मार्चपासून जेद्दाहहून मुंबईसाठी दोन आणि दिल्लीसाठी एक उड्डाण करण्याची याेजना असल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

