बदलापूर जोड

बदलापूर जोड

Published on

बदलापूर जोड

याप्रकरणी जळगावातून आणखी एका महत्त्वाच्या संशयिताला अटक करण्यात आली आहे. बदलापूर पोलिसांनी नाशिकमधील डॉ. अमोल पाटील याला अटक केल्यानंतर त्याचा सहकारी पोलिसांच्या रडारवर होता. त्याला जळगाव येथून अटक करण्यात आली असून, हा आरोपी ठाण्यातील सेंटरची जबाबदारी सांभाळत होता. तसेच सॅम्पल नाशिक येथे नेणे, आधार कार्डमध्ये फेरफार करणे व खोटी कागदपत्रे तयार करणे, अशी महत्त्वाची कामे करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, डोनर महिलांना कमी मोबदला देऊन त्यांचे स्त्रीबीज कोट्यवधी रुपयांना विकले जात असल्याची शक्यताही तपासात पुढे येत आहे.

आतापर्यंत बदलापूरसह उल्हासनगर, ठाणे, नाशिक आणि जळगाव येथून एकूण सात आरोपींना अटक करण्यात आली असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com