कुंभार समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न

कुंभार समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न

Published on

खारघर, ता. ५ (बातमीदार) : नवी मुंबईत कुंभार समाज गुण्या-गोविंदाने राहत जाहे. आम्ही कायम कुंभार समाजाच्या पाठीशी असून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनदरबारी प्रयत्नशील राहील, असे आश्वासन माजी खासदार संजीव नाईक यांनी दिले. या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश कुंभार सामाजिक संस्थेचे प्रदेशाध्यक्ष रमाकांत क्षीरसागर, नवी मुंबई कुंभार समाज मंडळाचे अध्यक्ष मोहन कुंभार, महेश सायकर, सोमनाथ सोनवणे, वसंतराव घोडनदीकर, अनंत कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. गजानन चौलकर यांना जीवनरत्न पुरस्कार, हभप भगवान बुवा आपटेकर यांना भजनरत्न पुरस्कार, तर विनायक कुंभार आणि अनिल कुंभार यांना कुंभारसमाज भूषण पुरस्कार, नृत्यांगना आर्या मंगेश नारंगीकर हिला नृत्यरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना चषक व प्रशस्तिपत्र देऊन कौतुक करण्यात आले. हा मेळावा वाशी येथील तमिळ संगम सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपाध्यक्षा निर्मला भागवत आणि कार्याध्यक्ष संतोष चौलकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com