सानपाडा, तुर्भे येथे शिवजयंती महोत्सवाचे आयोजन
तुर्भे, ता. ५ (बातमीदार) : सानपाडा, तुर्भे येथे तिथीप्रमाणे शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
एपीएमसी फळ मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ६) राजे शिवाजी उत्सव मंडळाच्या वतीने १८ फूट उंच रेणुका देवीची प्रतिकृती, २२ फूट उंच ३० फूट लांब रामेश्वर मंदिर, १५ फूट उंच गजमुखाची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. तसेच देखाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती स्थापन करून शिवकालीन चलचित्र, घोड्यावरून महाराजांची आणि मावळ्यांची मिरवणूक शिवकालीन खेळ, शिवकालीन देखावे अशी २०० ऐतिहासिक पात्रे असलेली मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता ढोल-ताशांच्या गजरात ही मिरवणूक निघणार आहे. दुपारी १ वाजता शिवभंडारा (अन्नदान), सायंकाळी ६.३० वाजता मराठी वाद्यवृंद कार्यक्रम होणार आहे.
सानपाडा सेक्टर आठ येथे आयोजक मिलिंद सूर्यराव यांच्या वतीने सायंकाळी ४ वाजता शिव प्रतिमापूजन, लाठीकाठी आणि तलवारबाजी प्रात्यक्षिके, त्यानंतर प्रा. विशाल गरड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

