राष्ट्रीय विज्ञान दिन विक्रमगडमध्ये साजरा

राष्ट्रीय विज्ञान दिन विक्रमगडमध्ये साजरा

Published on

राष्ट्रीय विज्ञान दिन विक्रमगडमध्ये साजरा
विक्रमगड (बातमीदार) ः देशात २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. महान भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी लावलेल्या ‘रामन परिणाम’ या शोधाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. विक्रमगड हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय, विक्रमगड येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शाळा भरल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, शास्त्रज्ञांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. सी. व्ही. रामन तसेच विक्रम साराभाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विज्ञान गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. या उपक्रमातून विज्ञानाची उपयुक्तता समाजात पोहोचवणे, वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे, विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण करणे, हा उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com