दर्जेदार उत्पादनासाठी सेंद्रिय शेती गरजेची!

दर्जेदार उत्पादनासाठी सेंद्रिय शेती गरजेची!

Published on

दर्जेदार उत्पादनासाठी सेंद्रिय शेती गरजेची!
प्रशिक्षण कार्यक्रमात कृषी शास्त्रज्ञ भरत कुशारे यांचे प्रतिपादन
वाणगाव, ता. ५ (बातमीदार) : सेंद्रिय पदार्थांमुळे मातीचा पोत सुधारतो, कर्ब वाढतो आणि जमीन मऊ, भुसभुशीत व सुपीक होते. सेंद्रिय शेती आता रासायनिक शेतीला सक्षम पर्याय ठरत असून, कमी उत्पादन खर्च आणि उच्च दर्जाच्या उत्पादनामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती पद्धतीचा स्वीकार करावा, असे प्रतिपादन कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भरत कुशारे यांनी कोसबाड येथील प्रशिक्षण कार्यक्रमात केले.
कृषी विद्यान केंद्र कोसबाड हिल अणि आत्मा कृषी विभाग वाडा, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल येथे शेतकऱ्यांसाठी दोनदिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विलास जाधव, शास्त्रज्ञ भरत कुसारे, प्रगतशील सेंद्रिय शेतकरी चंद्रकांत पाटील, आत्म्याचे मनोज वाकळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी उत्पादनात वाढ, शाश्वतता, पाण्याची बचत, मातीचे आरोग्य आणि शेतजमीन परिसंस्थेतील सुधारणाबाबत नैसर्गिक शेतीची परिणामकारकता अनेक रोजगार आणि ग्रामीण विकासाला वाव असलेली सेंद्रिय शेतीपद्धती आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीचा सेंद्रिय शेतमाल विकता येण्यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आत्माचे प्रकल्प संचालक विनायक पवार यांनी सांगितले.
--------------------------------
जमिनीमध्ये जिवाणूंची संख्या वाढवण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांऐवजी जैविक कीटकनाशकांचा वापर फायदेशीर होईल. त्यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन मिळण्यास मदत होईल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतात सेंद्रिय खते वापरावीत, जेणेकरून जमिनीचे आरोग्य सुधारण्यात मदत होईल.
- डॉ. भरत कुशारे, कृषी शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल
---------------------------
कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाने सेंद्रिय शेतीत पाऊल टाकले. सेंद्रिय शेतीमुळे पीक उत्पादनाची गुणवत्ता सुधारून मूल्यही वाढले आहे. स्वतःच्या जागेत नैसर्गिक औषधे, खते निर्मिती केंद्र उभारून शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करण्यात येत आहे.
- चंद्रकांत पाटील, सेंद्रिय खत उत्पादक, नरपड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com