मोफत बसप्रवासाची महिलांना भेट

मोफत बसप्रवासाची महिलांना भेट

Published on

मोफत बसप्रवासाची महिलांना भेट
जागतिक महिलादिनी सुविधा, मिरा-भाईंदर पालिकेचा उपक्रम
भाईंदर, ता. ५ (बातमीदार) : मिरा-भाईंदरमधील महिलांना परिवहन सेवेच्या सर्व बसमधून दिवसभर मोफत प्रवासाची संधी आहे. जागतिक महिलादिनानिमित्त महापौर डिंपल मेहता यांच्या सूचनेनुसार पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
गेल्या पाच वर्षांपासून जागतिक महिलादिनानिमित्त महापालिकेकडून महिलांना एक दिवस मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. यावर्षी ही परंपरा कायम ठेवण्याबाबत महापौर डिंपल मेहता यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महिला प्रवाशांच्या सन्मानार्थ ८ मार्चला विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमाला शहरातील महिलांकडून मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत आहेत. तर यंदाही उपक्रमाला महिलांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
-----------------------------
वर्ष महिला प्रवासी
२०२१ - ११,५५२
२०२२ - २१,४६१
२०२३ - २५,८३८
२०२४ - २२,१३१
२०२५ - ३३,४३२
-----------------------
मिरा-भाईंदर महापालिका परिवहन उपक्रमामार्फत शहरांतर्गत तसेच शहराबाहेरील ठाणे व बोरिवलीपर्यंत प्रवासी बससेवा नियमितपणे चालविण्यात येत आहे. महिलांच्या सन्मानार्थ राबविण्यात येणाऱ्या उपक्रमातून महिलांना सुरक्षित, सुलभ प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे.
- डिंपल मेहता, महापौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com