अंधेरीतील नागरदास रोडवर खोदकाम

अंधेरीतील नागरदास रोडवर खोदकाम

Published on

अंधेरीतील नागरदास रोडवर खोदकाम; नागरिक त्रस्त
जोगेश्‍वरी, ता. ५ (बातमीदार) : अंधेरी पूर्वेतील जुना नागरदास रोडवर गेल्या चार दिवसांपासून रस्त्याचे अर्ध्याहून अधिक खोदकाम करून ठेवण्यात आल्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या मध्यभागी खोदकाम करून बाजूला मातीचे ढिगारे टाकण्यात आले असून, बॅरिकेट्स लावून मार्ग अंशतः बंद ठेवण्यात आला आहे.
या ठिकाणी पालिकेकडून रस्‍त्‍याच्‍या कामासंदर्भात कोणताही माहिती फलक लावण्यात आलेला नसल्याने हे काम नेमके कोणत्या कारणासाठी सुरू आहे आणि ते कधीपर्यंत पूर्ण होणार, याबाबत नागरिक अनभिज्ञ आहेत. सायंकाळच्या गर्दीच्या वेळी वाहतुकीचा मोठा खोळंबा होत असून, पादचाऱ्यांनाही अरुंद जागेतून मार्ग काढावा लागत आहे. पालिकेने तातडीने माहिती फलक लावून काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com