भगवंताचे नामस्मरण हेच पापमुक्तीचे साधन : वसंत महाराज कळंबे

भगवंताचे नामस्मरण हेच पापमुक्तीचे साधन : वसंत महाराज कळंबे

Published on

भगवंताचे नामस्मरण हेच पापमुक्तीचे साधन : वसंत महाराज कळंबे
संत तुकाराम महाराज बीज महोत्सवानिमित्त कीर्तनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
घाटकोपर, ता. ४ (बातमीदार) : श्री संत तुकाराम महाराज भजनी मंडळ यांच्या विद्यमाने आयोजित संत तुकाराम महाराज बीज महोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. सद्गुरु ज्ञानेश्वर मोरे माउली यांच्या कृपाशीर्वादाने तसेच सद्गुरु दादा महाराज मोरे माउली यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार, ३ मार्च ते शुक्रवार, ६ मार्च या कालावधीत हा महोत्सव साजरा होत आहे.
महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी कीर्तनकार वसंत महाराज कळंबे यांची कीर्तनरूपी सेवा उत्साहात पार पडली. आपल्या कारकिर्दीतील पहिलेच कीर्तन सादर करताना त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांमधून भक्तीचे गूढ आणि विठ्ठलनामाची महती प्रभावीपणे उलगडून सांगितली.
“एक गावे आम्ही विठोबाचे नाम, आणिकांपे काम नाही आता” या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी तुकाराम महाराजांची विठ्ठलावरील अढळ निष्ठा आणि नामस्मरणाचे महत्त्व स्पष्ट केले. कलियुगात भगवंताचे नामस्मरण हेच पापमुक्तीचे प्रभावी साधन असून त्यातूनच जीवनाचा खरा उद्धार साध्य होतो, असा संदेश त्यांनी उपस्थित भाविकांना दिला. कीर्तन सोहळ्याला गायक सतीश कळंबे व अंकुश सकपाळ यांनी स्वरांची साथ दिली, तर मृदुंगचार्य लक्ष्मण कळंबे आणि ओमकार पोकळे यांनी तालबद्ध साथ देत कार्यक्रमाची शोभा वाढवली. मृदंग-टाळांच्या निनादात आणि “विठ्ठल विठ्ठल”च्या जयघोषात परिसर भक्तिमय झाला होता.
चार दिवस चालणाऱ्या या बीज महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर मोरे, रामचंद्र कळंबे आणि तुकाराम मोरे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com